Ad will apear here
Next
‘पोलिसांना ऊर्जा देणारा ‘लायन्स’चा उपक्रम’


पुणे : ‘गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस अहोरात्र बंदोबस्तात असतात. जवळपास ३० तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांना सकस आहार मिळावा, यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उभारलेले श्रमपरिहार केंद्र पोलिसांसाठी ऊर्जा देणारा उपक्रम आहे. या भोजनव्यवस्थेमुळे आमच्या पोलिस कर्मचाऱ्यांना, सुरक्षारक्षकांना आणि पोलिस मित्रांना बंदोबस्त करताना कुठलीही अडचण भासत नाही,’ असे मत सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.

लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे उभारलेल्या श्रमपरिहार केंद्राचे उद्घाटन बर्गे यांच्या हस्ते झाले. गेल्या १४ वर्षांपासून हे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात येते. या प्रसंगी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल रमेश शहा, उपप्रांतपाल अभय शास्त्री, माजी प्रांतपाल फतेचंद रांका, आशा ओसवाल, लायन्स क्लब ऑफ पूना सारसबागचे अध्यक्ष प्रवीण ओसवाल, सचिव संतोष पटवा व खजिनदार दीपा गांधी, चेअरपर्सन कल्पेश पटनी यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



रांका म्हणाले, ‘तीन हजार पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी, होमगार्ड्स, पोलीस मित्र आणि आणि रांगोळीच्या पायघड्या घालणाऱ्या राष्ट्रीय कला अकादमीच्या तीनशे स्वयंसेवकांना पॅकेट्समधून ताजे व पौष्टिक जेवण दिले जाते. शिवाय केंद्रावर ८०० ते एक हजार लोक जेवण करतात. घरगुती पोळ्या, भाजी, पुलाव व गुलाबजाम आदी पदार्थ यामध्ये असतात. रविवारी सकाळी ११ ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ही भोजनव्यवस्था करण्यात आली.’

‘समाजाच्या सुरक्षेसाठी २४ तास तैनात असलेल्या पोलीस व पोलीस मित्रांसाठी सामाजिक भावनेतून ‘लायन्स क्लब’ने हा उपक्रम राबविल्याचे समाधान आहे,’ असे शहा म्हणाले.

महापौर मुक्ता टिळक व अनेक नगरसेवकांनी पोलिसांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZKJBS
Similar Posts
‘लायन्स’तर्फे पोलिसांसाठी श्रमपरिहार केंद्र पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडावी, यासाठी अहोरात्र बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना घरचे जेवण मिळावे, यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागतर्फे लक्ष्मी रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथे श्रमपरिहार केंद्र उभारण्यात आले आहे.
लहान मुली देणार वाहतुकीच्या नियमांचे धडे पुणे : अलीकडील काळात वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अनेकदा वाहतूक ठप्प होते. मोठ्या शहरांत तर या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. ही बाब हेरून पुण्यातील विविध शाळांमधील २०० लहान मुली एकत्र येऊन वाहनधारकांमध्ये वाहतुकीचे नियम पालन व शिस्त याबाबत जागृती करणार असून, वाहतूक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत
मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ पुणे : ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ या सौंदर्य स्पर्धेचा दुसरा सिजन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उंची, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांवर मंजूषा मुळीक यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ चा किताब पटकावला.
‘शोध मराठी मनाचा’ संमेलन पुण्यात पुणे : जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ हे पंधरावे जागतिक संमेलन एक ते तीन जानेवारी २०१८ या कालावधीत पुणे येथे होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ऑस्ट्रेलिया येथील अभियंते आणि ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलेले डॉ. विजय जोशी भूषवणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language